बैलगाडा शर्यत सुरु करा; बैलगाडा मालकांचा मावळ तहसीलवर मोर्चा दिलीप कांबळे
महाराष्ट्र

बैलगाडा शर्यत सुरु करा; बैलगाडा मालकांचा मावळ तहसीलवर मोर्चा

बैलगाडी शर्यत सुरु करावी यासाठी वडगांव तहसील कार्यालयावर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे.

दिलीप कांबळे

मावळ : महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी चालू व्हावी यासाठी वडगाव मावळ येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी, बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे. ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे.

हे देखील पहा -

या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु करावी यासाठी वडगांव तहसील कार्यालयावर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेत. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे.

बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे. राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात असे भेगडे म्हणाले. या आंदोलनात मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शेतकरी आणि शर्यतप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT