ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

Maratha reservation Protest: बीडमधील ST बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द; महामंडळाच्या निर्णयाने प्रवाशांचे हाल, कारण काय?

Maratha reservation Protest in beed: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सभेतील भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विनोद जिरे

Maratha reservation Protest:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून २४ डिसेंबरच्या अल्टिमेटममुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. याचदरम्यान, बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे. या सभेतील मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

बीडमधील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी हजारो मराठा बांधव जमा झाले आहेत. या सभेआधी मनोज जरांगे यांची जंगी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे उपस्थितांना सभास्थळी संबोधित करणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बीड बसस्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यात एसटीचं चाक पुन्हा एकदा थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. बीडमधील मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस सेवा बंद केल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापुरात उद्यापासून जमावबंदी लागू

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर पहाटे चारपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सात जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी याबाबत आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT