अलिबागच्या पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छामरण परवानगी!  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अलिबागच्या पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छामरण परवानगी!

मुख्यमंत्री, राज्यपाल यांना पाठविले पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे आम्हाला माहीत आहे. आमची मानसिक अवस्था बिकट झाली आहे, वारंवार निवेदन देऊनही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी आर्त विनवणी अलिबाग एसटी आगारातील पावणे तीनशे कर्मचारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली आहे. स्वेच्छामरण परवानगी द्या याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल यांना मेलद्वारे पत्र पाठविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेकडे आता मुख्यमंत्री कसे पाहणार याकडे लक्ष्य लागले आहे.

हे देखील पहा :

अलिबाग आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी 1 नोव्हेंबर रोजी प्रथम संपाची हाक दिली होते. त्याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना संपाचे पत्र दिले होते. त्यानंतर राज्यात संप हा सुरू झाला. शासनाने त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली. मात्र, तरीही कर्मचारी विलीकरणाच्या मुद्यावर आजही ठाम राहिले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फ, निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेक वेळा कामावर रुजू होण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण अद्यापही कामगार हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्यापही अंधातरीच राहिला असून यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था बिकट होऊ लागली आहे. वारंवार निवेदन देऊनही शासन प्रतिसाद देत नाही असा आरोप पत्राद्वारे कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र ते करणे कायद्याने गुन्हा आहे हे आम्हास ठाऊक आहे. तरी आम्ही कोणाच्याही दबावाला बळी न पडता आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या असे सहीने आपणास सूचित करत आहोत.

आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात या नात्याने आपण एसटी महामंडळ विलीनीकरण करा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रासातून मुक्त करावे आम्हाला जीवनदान द्यावे अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या अशी विनवणी अलिबाग एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT