SSC Supplementary Examination Saam TV
महाराष्ट्र

SSC Supplementary Examination: दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट; पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

10th 12th Supplementary Exam: राज्यात २ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. निकालात यंदा देखील मुलींनी बाजी मारलीये. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यांदाचा निकाल ३.११ टक्क्यांनी घसरल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी फॉर्म घेण्यास सुरुवात केली आहे. (Marathi News)

उद्यापासून ऑनलाइन अर्ज भरा

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी (ssc supplementary examination) उद्यापासून ऑनलाइन अर्ज खुला होणार आहे. दहावीच्या जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बुधवारी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षेस यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

अर्ज कसा भरायचा

ऑनलाइन अर्ज (Online Application) करण्यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही अर्ज करू शकता. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्यासाठी मुदत ७ ते १६ जून नियमित शुल्कासह असेल. २१ जून पासून विलंब शुल्कासह अर्ज भरावे लागणार आहेत.

दहवीच्या निकालाची वैशिष्ट्ये

- 92.49 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

- परीक्षा माध्यमे - 08

- एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात प्रश्नपत्रिका नेणाऱ्या रनरचे जीपीएस झाले ट्रॅकिंग

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : 95.64 टक्के

नागपूर : 92.05 टक्के

औरंगाबाद : 93.23 टक्के

मुंबई : 93.66 टक्के

कोल्हापूर : 96.73 टक्के

अमरावती : 93.22 टक्के

नाशिक : 92.22 टक्के

लातूर : 92.67 टक्के

कोकण : 98.11 टक्के

गेल्या काही वर्षातील एकूण निकालाची टक्केवारी :-

वर्ष : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

2023: 93.86 टक्के

2022: 96.94 टक्के

2021: 99.95 टक्के

2020: 95.30 टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT