SSC Exam Result 2022 news updates Saam TV
महाराष्ट्र

SSC Result: राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के; जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल - ९६.९४ % इतका लागला. यंदा कोकण (Koknan) विभागाची बाजी तर नाशिक (Nashik) विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. (SSC Exam Result 2022 news updates)

यंदा १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. आनंदाची बाब म्हणजे यंदा राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला.

हे देखील पाहा -

निकालाची वैशिष्ट्ये -

1. यंदा दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे.

2. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.

3. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९७.७६ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९६.०६ आहे.

4. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.

5. ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला.

6. २०२२ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२१ च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे.

7. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५४,३०३ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ७९.०६ टक्के आहे.

8. या परीक्षेत ६ लाख पन्नास हजार ७७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार ०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार ०२७ द्वितीय श्रेणीत तर ४२हजार १७० मुलं उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

9. राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT