SSC New syllabus 
महाराष्ट्र

SSC: विज्ञान,गणितात 20 गुण मिळाले तरी 11वीत प्रवेश; नव्या अभ्यासक्रमाने 10वीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी होणार

SSC New syllabus : 10वीच्या मुलांचं गुणांचं टेन्शन कमी करणारी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान,गणितात 20 गुण मिळाले तरी 11वीत प्रवेश मिळणार आहे.

Snehil Shivaji

नव्या अभ्यासक्रम आराखड्यानं दहावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन संपवलंय. कारण आता दहावीत गणित आणि विज्ञानात 20 मार्क मिळाले तरी तुम्ही अकरावीत जाऊ शकता. नेमका काय निर्णय घेण्यात आला पाहूया.

1 . नव्या अभ्यासक्रम आराखड्यात गणित आणि विज्ञानावर तोडगा

2. दहावीच्या बोर्ड परिक्षेत गणित, विज्ञानात उतीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी 20 गुण लागणार

3. 20 गुण मिळाल्यासही पुढील शिक्षण घेता येणार

4. परिक्षा पुन्हा देणे किंवा विशिष्ट शेऱ्यासह दहावीचं प्रमाणपत्र स्विकारणे असे २ पर्याय

या नवीन आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या गणित आणि विज्ञान विषयात पास होण्याची अट ही केवळ २०मार्कांवर आलीये. परंतु २० मार्कांवर पास होऊन पुढे जायचं असेल तर प्रमाणपत्रावर विशिष्ट शेरा मिळणार आहे. जर हा शेरा नको असेल तर मात्र पुन्हा परिक्षेचा जुना पर्याय देखिल आहेच. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता येतील. पण एक लक्षात ठेवा, ही सुट फक्त गणित आणि विज्ञानासाठी असून इतर विषयांसाठी तुम्हाला भरपुर अभ्यास करावाच लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचे ₹३००० एकत्र येणार नाहीत? कारण काय?

Maharashtra Live News Update: वीज वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला

Sunny Deol Film: सनी देओल त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स; नव्या चित्रपटातील खास सीन लीक

MHADA Lottery Cancel : म्हाडा विजेत्यांना मोठा दणका! घराचा ताबा न घेतल्याने हक्क रद्द होणार

Bribe Case : गावच्या कारभारीने मक्तेदाराकडून घेतले ८० हजार; एसीबीच्या कारवाईत तिघेजण ताब्यात

SCROLL FOR NEXT