SSC And HSC Exam Saam Tv
महाराष्ट्र

SSC And HSC Exam: दहावी-बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

SSC And HSC Exam Registration Date Extended: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा होते. या परिक्षेसाठी अर्ज भरण्यास फार पूर्वीपासूनच सुरुवात होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करु शकतात. (SSC And HSC Exam Registration Date Extended)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत तुम्ही नियमित शुल्कासह अर्ज भरु शकतात. तर २० ते ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी ही माहिती दिली आहे. याचसोबत प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती.मात्र, आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. (10th And 12th Exam Registration Date Extended)

शाळांनी अर्ज कसा करावा?

माध्यमिक शाळांनी अर्ज करण्यापूर्वी शाळा, संस्था आणि शिक्षक याबाबतची माहिती मंडळाकडे पाठवावे लागणार आहे.परीक्षा अर्ज हे शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT