Death threat to MLA Bachchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: 'आज मौका देख के कडू को चौका मारेंगे', कोण उठलं आमदार बच्चू कडूंच्या जीवावर?

Death threat to MLA Bachchu Kadu: प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे पत्र दिले आहे. आपला अपघात झाला, अशी अफवाही काही लोकांकडून पसरवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

Girish Nikam

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू सतत चर्चेतील व्यक्तीमत्व आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुती विरोधात उमेदवार देऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष छेडला. लोकसभेचा धुरळा शांत होत नाही तर पुन्हा अमरावतीतलं राजकीय वातावरण तापलंय.

आक्रमक बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते कुठल्या अभिनव आंदोलनामुळे नव्हे तर त्यांना आलेल्या धमकीमुळे...अचलपूर परीसरात दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीनं एका भाजीविक्रेत्याशी बोलताना कडूंना संपवण्याची भाषा केली. तर दुस-या एक घटनेत चांदुरबाजार इथं एका हॉटेलमध्ये तीन व्यक्तींनी 'आज मौका देख के कडू को चौका मारेंगे', असं व्यक्तव्य केलंय. बच्चू कडूंनी या प्रसंगाचा उल्लेख करुन जिवाला धोका असल्याबाबत पोलिस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, आपला अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचीही तक्रार बच्चू कडूंनी या पत्रातून केली आहे. भाजी विक्रेत्याशी बोलताना धमकी देणाऱ्यांनं म्हटलं आहे की, ''मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजिकचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेवू. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसंच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही. बच्चू कडुला पाहून घेऊ.''

असं वक्तव्य करुन अज्ञात व्यक्तीनं खिशातून मोबाईल काढून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसमवेतचे फोटो दाखवत या सर्वांचा माझ्या डोक्यावर हात असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे चांदूर बाजारमध्ये एका हॉटेल मध्ये तीन व्यक्तींमध्ये 'आज मौका देख के कडू को चौका मारेंगे' असा संवाद झाल्याची तक्रार कडूंनी केली आहे.

मे महिन्यात प्रचारादरम्यान प्रहारचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारच्या काचा फोडल्या होत्या. आता बच्चू कडू यांना धमकी मिळत असल्यांनं प्रहारचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा प्रकार गंभीर आहे. पोलिस या धमकीच्या मुळाशी जाऊन काय शोधून काढतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT