Rahul Narwekar Latest News SAAM TV
महाराष्ट्र

Rahul Narwekar statement: मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन! शिंदेंच्या मंत्र्यांसमोरच राहुल नार्वेकरांच सूचक वक्तव्य

Rahul Narwekar Latest News: सत्ता संघर्षाच्या कोर्टाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रकरणावर लवकरच निर्णय घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Narwekar on Maharashtra Political Crisis: मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे विधान केले आहे.

स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाच्या कोर्टाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रकरणावर लवकरच निर्णय घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

राहुल नार्वेकर म्हणाले, १९७७ साली माझा जन्म झाला तेव्हा विधानसभा अध्यक्ष देसाई होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे क्रांतिकारक निर्णय मीही घेईन. पण निर्णय आता सांगणार नाही, जो निर्णय घेईल तो मेरिटवर घेईन असे देखील नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले, बाळासाहेब देसाईंचा सामाजिक कार्याचा वारसा शंभूराज देसाई पुढे नेत आहेत. बाळासाहेब देसाईंनी आपल्या कामातून राज्य घडवलं. त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलावलं हे माझं भाग्य आहे. (Breaking News)

अनंतकाळ आपलं काम गाजवणाऱ्यांपैकी एक बाळासाहेब देसाई होते. ईबीसी, शिक्षण खात्यातही त्यांनी मोठं कार्य केलं. ईबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. महसूल खात्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. मालोजीराजेंनंतर पीडब्ल्यूडीची जबाबदारी बाळासाहेबांकडे आली. त्यावेळी त्यांनी दर्जेदार कार्य त्यांनी केलं. गृहखात्याचीही जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. (Rahul Narwekar statement)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

मुंबईची मोकळी मैदानं भाजप ढापायला निघालंय; ठाकरेंचा CM फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT