Maharashtra Police, Barshi
Maharashtra Police, Barshi  SaamTv
महाराष्ट्र

Barshi : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी महिला पोलिस अधिकाऱ्यासह चाैघे निलंबित; बार्शीत खळबळ (पाहा व्हिडीओ)

विश्वभूषण लिमये

Barshi News : इयत्ता बारावीमधील (HSC) मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात चालढकल केल्याने साेलापूर जिल्हा पाेलिस (Solapur Police) दलातील बार्शी तालुक्यातील (Barshi Police) दोन पोलिस अधिका-यांसह दोघा हवालदार यांना निलंबित केले आहे. ही कार्यवाही सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे (sp shirish sardeshpande) यांनी केली आहे. जागतिक महिला दिनी (Women's Day) झालेल्या या कारवाईत पाेलिस अधिकारी देखील सापडल्या आहेत. (Maharashtra News)

बार्शीत पाच मार्च रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी गुन्हा दाखल होऊनही संशयितांना पोलिसांनी अटक केली नाही. त्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडित मुलीवर सहा मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात पीडित मुलीच्या दोन बोटांना इजा झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आरोपीला अटक न करणे, कर्तव्यात कसूर करणे असा ठपका ठेवून पाेलिस कर्मचा-यांवर कारवाई केली आहे.

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय महारुद्र परजणे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, बार्शी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ, बार्शी तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार राजेंद्र मंगरुळे, बार्शी शहर पोलिस ठाण्यातील हवालदार अरुण माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Travis Head Runout: ट्रेविस हेड आऊट की नॉटआऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयावरून संगकाराचा पारा चढला - video

Hemant Soren: हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, हायकोर्टाने फेटाळली याचिका; फक्त 'या' गोष्टीला दिली परवानगी

Budh Gochar 2024: १० मे नंतर 'या' तीन राशींना होणार धनलाभ; बुध देव करणार करोडपती होण्याचा आशीर्वाद

Britney Spears : हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली पॉप सिंगर; सोशल मीडिया ढवळून निघालं, ती म्हणतेय, हे सर्व खोटं आहे!

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर; विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन- संवर्धनाचे काम रखडले

SCROLL FOR NEXT