bhandara, police, lohit matani saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : 'साम' चा दणका; एसपींनी ताे प्रकार पाहताच पाेलिसांची केली बदली, वरिष्ठस्तरावर चाैकशी सुरु

या कारवाईनंतर पाेलिसांची चाैकशी देखील सुरु आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara : कोंबड़यांची झुंज सुरु असताना ती पाहून आयाेजकांवर काेणतीच कारवाई न केल्याने तीन पाेलिसांची एसपींनी तात्काळ बदली आहे. संबंधित पाेलिसांची उपाधिक्षक यांच्या माध्यमातून चाैकशी देखील हाेणार आहे. ही कारवाई भंडारा जिल्ह्यात घडली आहे. साम टीव्हीने हा सारा प्रकार प्रसारित केल्यानंतर एसपींनी त्याची दखल घत ही कारवाई केली आहे.

कोंबड़यांची झुंजीवर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलिस कारवाई करण्यासाठी गेले हाेते. परंतु ही झुंड पाहण्याचा मोह या पाेलिसांना झाला. आता हा माेह त्यांना चांगलाच भोवला आहे. ही झुंज पाहतानाचा पाेलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला.

हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आला. साम टीव्हीने याचे वृत्त प्रसारित केले. हे वृत्त प्रसारित हाेताच भंडारा जिल्ह्यात त्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान या वृत्ताची भंडारा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी दखल घेत तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची तड़का फड़की पोलिस मुख्यालयात बदली केली. (Breaking Marathi News)

यामध्ये लाखांदुर बिट जमादार वकेकर, बिट जमादार भोयर व ए. एस. आय नैताम यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फ़त सुरु झाली आहे. साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग याचा तपास करणार आहेत असे एसपींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणी हत्येच्या प्लॅनिंगची टाइमलाईन अखेर समोर

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Relationship vs Affair: रिलेशनशिप आणि अफेअर यांच्यात नेमका काय फरक आहे?

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा फक्त ₹12,500 गुंतवा अन् मिळवा १ कोटी, वाचा संपूर्ण माहिती

Exclusive : सिया-चेतनने ३१ मे पूर्वीच रचला डाव! केतन अग्रवाल हत्येच्या प्लॅनिंगची टाईमलाईन अखेर समोर, पाहा कट कसा शिजला?

SCROLL FOR NEXT