Buldhana Farmer Fraud News 
महाराष्ट्र

Soybean Scam : तब्बल ३०९ शेतकऱ्यांची कोट्यवधींना फसवणूक, ऐन दुष्काळात शेतकऱ्यांची लूट, महाराष्ट्रात संताप

Buldhana Farmer Fraud News : बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात सोयाबीन खरेदीच्या नावाखाली ३०९ शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. व्यापारी कैलास ढवळे आणि त्यांचा मुलगा आशिष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suprim Maskar

309 farmers cheated in Buldhana soybean scam : ऐन दुष्काळात बुलढाण्यात व्यापाऱ्यानं शेतकऱ्याची फसवणूक केलीय. सोयाबीनची खरेदी करूनही व्यापाऱ्यानं शेतकऱ्याचे पैसे न दिल्यानं शेतकरी कसे हवालदिल झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे लाटणाऱ्या व्यापाऱ्यावर अखेर बुलढाण्यात पोलिसांनी कारवाई केलीय. मेहकर तालुक्यातील देऊळगाव परिसरातील तब्बल 309 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी व्यापारी कैलास ढवळे आणि त्यांचा मुलगा आशिष ढवळे या पिता-पुत्राविरुद्ध जानेफळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलाय़. नेमकं प्रकरण काय? पाहूयात.

झोंगाबाई चव्हाण या 80 वर्षीय महिलेचा विश्वास मिळवून आरोपींनी 222 क्विटल सोयाबीन 6500 रुपयांप्रमाणे खरेदी केले.

व्यापारी कैलास ढवळे आणि आशिष ढवळेनं झोंगाबाईंना 93 हजार नगद दिले आणि उर्वरित 13 लाख 50 हजार रुपये एका महिन्याने देतो सांगत सोयाबीन घेऊन गेले.

एक महिना होऊनही आरोपी ढवळेंनी तक्रारदारास पैसे देण्यास टाळाटाळ केली...काही दिवसांनी आरोपी ढवळे गाव सोडून पळून गेले.

आपली आर्थिक फसवणुक झाल्याचं लक्षात येताच झोंगाबाईंनी पोलिसात धाव घेत अवैध सावकारांविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर ढवळे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झालाय..

मात्र केवळ झोंगाबाईच नव्हे तर देऊळगाव साकरशा परिसरातील तब्बल 309 शेतकऱ्यांचं सोयाबीन व्यापारी ढवळे पित्रा- पुत्राने अशाच प्रकारे लाटले..

जिजाबाई अल्हाट - 2 लाख 38 हजार 936 रूपये

मोहन आमले- 2 लाख

तुळशिराम माडोकार - 9 लाख 35 हजार

तर बळीराम राठोड यांचे तब्बल 33 लाख 64 हजार 636 रूपये या ढवळे पितापुत्रांनी थकवले...

फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत टेंभुर्णा येथील बुलढाणा अर्बन वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवण्यात आलेला तब्बल 10 हजार क्विंटल सोयाबीनचा साठा सील केलाय...

प्रशासनानं वेळीच कारवाई केली म्हणून निदान हा सोयाबीनचा साठा परत मिळाला..

आता सोयाबीनची अधिकृत मोजणी करून त्यानुसार शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत रक्कम त्यांना परत द्यावी अशी मागणी आता संतप्त शेतकरी करत आहेत..आधीच दुष्काळाने ससेहोलपट होत असताना पुन्हा या व्यापाऱ्यांंचा पाश शेतकऱ्यांना बसतो आहे..यावर प्रशासन कधी कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे...

संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger : सुनेत्रा पवारांचं विलिनीकरणावर सूचक विधान, नेमका अर्थ काय?

NCP Split : आता दादांची राष्ट्रवादी फुटणार? 20-22 आमदार बाहेर पडणार, खासदाराचा मोठा दावा

Ajit Pawar Death Controversy: अजितदादांचा अपघात नव्हे घातपात', दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचाही दावा

Car Accident : भाजप आमदार पुत्राच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ गंभीर; काँग्रेसनं केला खळबळजनक आरोप

Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यानं खैबर पख्तुनख्वा हादरलं; DSP, पोलीस उपनिरीक्षकासह ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT