Crime Saam
महाराष्ट्र

Washim: पैशांसाठी पोटच्या गोळ्याला संपवलं! बापाने चाकूने सपासप वार करत मुलाचा जीव घेतला; घरातच रक्ताचा पाट

Father Kills Son Over Property Dispute in Washim:संपत्तीच्या वादातून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली. सुरीचे सपासप वार करत, घरातच रक्ताचा पाट वाहू दिला.

Bhagyashree Kamble

वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. संपत्तीच्या वादातून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे.

काही दिवसांपासून कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होता. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात बापाने मुलावर सुरीने सपासप वार करत त्याची हत्या केली. घटनेनंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत त्याला अटक केली.

अनिल गोपाळ मोखडकर (वय वर्ष ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, गोपाळ मोखडकर असे आरोपी वडिलांचे नाव आहे. मोखडकर कुटुंब वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

वडील आणि मुलामध्ये गेल्या काही दिवसापासून संपत्तीवरून वाद सुरू होता. आज सकाळी पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेला. नंतर बापाने धारदार सुरी घेतली आणि आरोपीवर सपासप वार केले. वार इतके केले की घरातच रक्ताचा पाट वाहू लागला.

वडिलांनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर शेजाऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चौकशी करून आरोपी बापाला बेड्या ठोकल्या.

आरोपीला बेड्या ठोकत बापाची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करीत आहेत. या धक्कादायक घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी बापाविरोधात रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती काही काळातच वाऱ्यासारखी गावात पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT