Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, २ दुचाकीची समोरासमोर धडक, जावाई-सासऱ्याचा जागीच मृत्यू

Nashik Latest News Update : मुलीच्या घरून जेवण करून निघाल्यानंतर सासऱ्यांना जावई सोडण्यासाठी जात असताना काळाने घाला घातला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Nashik Latest News Update : नाशिकमध्ये भीषण अपघातात जावई आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर चेहेडी परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली, त्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सासरे अनिल लाजरास आणि जावई महेश नरवाडे असे मृत व्यक्तींची नावे आहेत. मुलीच्या घरून जेवण करून निघाल्यानंतर सासऱ्यांना जावई सोडण्यासाठी जात असताना काळाने घाला घातला.

नाशिकमध्ये बुलेटनं अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली, यामध्ये जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक पुणे हायवेवरील चेहेडी नाका येथे सर्विस रोडवर रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. बुलेटस्वार हात सोडून भरधाव वेगाने स्टंटबाजी करत होता, त्यावेळी भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

भरधाव बुलेटवर इनोश सतीश ब्राह्मणे आणि आर्यन अतुल गायकवाड हे दोन जण होते. स्टंटबाजी करण्यात तरूण व्यस्त होते, त्यावेळी समोरून अॅक्टिव्हावर सासरा आणि जावई आले होते. दोन्ही गाड्याची जोरदार धडक झाली. सासरा आणि जावई यांच्या डोक्याला जोरदार मार लागला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश गायखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार ब्राह्मणे आणि गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जावई आणि सासऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेवण झाल्यानंतर जावई सासऱ्याला सोडण्यासाठी अॅक्टिव्हावरून निघाला होता, त्यावेळी बुलेटने जोरदार धडक दिली, त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT