Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : पाचशे रुपयांत पेपर सेटिंग! परीक्षा सकाळी अन् सायंकाळी उत्तरपत्रिका लिहिण्याची काही ‘खास सोय’

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे. शहरापासून १८ किमी दूर शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र चक्क शेजारचे एका फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ‘ऑपरेट’ केले जात असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

या सेंटरवर सकाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास मुदत दिली जात होती. हे दुकानदार फक्त ३०० ते ५०० रुपये घेऊन संस्थाचालकाच्या मदतीने ही विशेष सोय उपलब्ध करून देत होते. याबाबत चिकलठाणा पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी कॉलेजमधील विद्यार्थी वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात परीक्षा देत आहे. एकूण १८० विद्यार्थी २३ मार्चपासून परीक्षा देत आहेत.सकाळी १० ते ११.३० आणि दुपारच्या सत्रात दुपारी १ ते २.३० पर्यंत पेपर असतात. या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाचे भरारी पथक फिरकतही नाही. त्यामुळे परीक्षेदरम्यान ‘मासकॉपी’ सर्रास सुरू असते.

पण तरीही प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिली नसतील तर त्यांना दोन्ही पेपर संपल्यानंतर दुपारी ४ नंतर वेगळा वेळ देऊन त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पुन्हा उत्तरपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी सकाळी पेपर लिहिताना उत्तरपत्रिकेत कोरी जागा सोडण्याचे ‘मार्गदर्शन’ही या परीक्षार्थींना आधीच केले जातात. त्यानंतर ‘खास’ सोय केलेले विद्यार्थी सोमवारी दुपारी ४ वाजता परीक्षा हॉलमध्ये देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

Cabbage Thalipeeth Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा गरमागरम कोबीचे खुसखुशीत थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ₹३०००; या दिवशी जमा होणार पैसे

Maharashtra Live News Update : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड

SCROLL FOR NEXT