Hindkesari 2024 Saamtv
महाराष्ट्र

Hind kesari 2024: 'हिंदकेसरी'चा किताब पुन्हा महाराष्ट्राकडे; दिल्लीच्या बल्लूला आस्मान दाखवत समाधान पाटीलने मैदान मारलं!

Hindkesari Kusti Spardha 2024: राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबावर सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या मल्लाचे नाव कोरले गेले आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले.

विश्वभूषण लिमये

Hindkesari KustiSpardha 2024:

राष्ट्रीय स्तरावरील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबावर सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या मल्लाचे नाव कोरले गेले आहे. तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने मैदान मारले. समाधान पाटील यांनी दिल्लीचे मल्ल बोलू खत्रीला आस्मान दाखवत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला.

यंदाची हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२४ तेलंगणा (Telangana) येथे पार पडली. यंदाची मानाची हिंदकेसरी गदा महाराष्ट्राकडे राहणार का? याबाबत कुस्ती शौकिनांमध्ये उत्सुकता होती. सोलापूरचा पैलवान समाधान पाटील (Samadhan Patil) आणि दिल्लीच्या बल्लू खत्री यांच्यामध्ये हिंदकेसरीची अंतिम लढत झाली. या लढतीत समाधान पाटील याने दिल्लीच्या मल्लाला आस्मान दाखवत मैदान मारले.

सलग दुसऱ्यावर्षी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची गदा महाराष्ट्राच्या पैलवानांनी मारल्याने समाधान पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्यावर्षी अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर आस्मान दाखवत हिंदकेसरी कुस्तीचे मैदान मारले होते.

दरम्यान, यंदाचा हिंदकेसरी विजेता पैलवान समाधान पाटील हा मुळचा सोलापूरचा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता सिकंदर शेखच्याच (Sikandar Sheikh) मोहोळ तालुक्यात त्याचे गाव. एकाच वर्षात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी दोन्ही गदा मोहोळ तालुक्यातचं आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT