Solapur Water Supply saam tv
महाराष्ट्र

Solapur Water Supply : सोलापूर शहरात ४ दिवसांआड पाणी पुरवठा; तुमच्या घरी केव्हा येणार पाणी?

पाणीपुरवठा विभागाने आता नागरिकांना ४ दिवसआड पाणी देण्याचा निर्णय घेताला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Water Supply : गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात सर्वत्र पाण्याची बोंब आहे. नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल यासाठी आजवर अनेक सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिली आहेत. मात्र अद्याप तसे चित्र दिसलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना ४ दिवसआड पाणी देण्याचा निर्णय घेताला आहे. (Solapur News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरात पहाटे ४ ते दुपारी १ या वेळेमध्येच पाणी सोडण्यात येणार आहे. सर्व विभागांसाठी एकून ३ टप्प्यांमध्ये पाणी सोडले जाणार आहे. 'स्मार्ट सिटी'मध्ये सोलापूर शहर आल्यानंतर येथे सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र स्मार्ट सिटी फक्त शहरातील काही ठरावीक भागांमध्येच पाहायला मिळाली.

५४ वर्षांपासून जुनाट पाइपलाइन अजूनही तशीच

५४ वर्षांपूर्वीची जुनाट पाइपलाइन आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने बदलली नाही. कधी वीजेचा लपंडाव तर कधी पाइपलाइनला गळती, यामुळे शहराचा पाणीपुरवठा नेहमीच विस्कळित झाल्याचं चित्र कायम आहे. त्यात पुन्हा अवेळी पाणी येत असल्याने नागरिकांची झोप उडाली होती. अशात आता पाण्याच्या वेळा ठरवून दिल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

'झोन' ऑफिसच्या बाहेर पाण्याचे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही मागच्या 22 वर्षांपासून शहराला नियमित पाणी मिळू शकलं नाही. औज बंधारा आणि उजनीचा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असताना ही पाणी वितरणाच्या आभावामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक मागच्या काही दिवसांपासून सोलापूरकरांच्या पाण्यावर आवाज उठवताना दिसले. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नव्हते. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

Elephant Food: हत्ती काय खातो? तुम्हाला माहितीये का?

Honda N-One e: रेट्रो लूक...होंडाची नवीन N-One e कार, अल्टोपेक्षा लहान आणि खास वैशिष्ट्यांनी भरलेली

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार | VIDEO

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

SCROLL FOR NEXT