सोलापुरात शिवसेनेचे दोन गट एकमेकांच्याच आमने सामने  विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

सोलापुरात शिवसेनेचे दोन गट एकमेकांच्याच आमने सामने

शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांची उपस्थिती होती मात्र,बैठक सुरू होण्यापूर्वीच एका बाजूला विठ्ठल वानकर यांचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांचे कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली.

विश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापुरात Solapur युवासेनेच्या पदाधिकारी बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते. सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर आणि शहर दक्षिण या भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला युवा सेनेचे जिल्हा निरीक्षक विपुल पिंगळे हे मार्गदर्शन करणार होते. या बैठकीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांची उपस्थिती होती. मात्र,बैठक सुरू होण्यापूर्वीच एका बाजूला विठ्ठल वानकर यांचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांचे कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली.

दरम्यान, वानकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली,
"मनीष काळजे हटाव,युवासेना बचाव..
मनीष काळजे यांचा धिक्कार असो"
अशी घोषणाबाजी तसेच फलक घेऊन वानकर यांचे कार्यकर्ते यांनी ही घोषणाबाजी केली.

दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
"मनीष काळजे आगे बढो हम तुम्हारे साथ है",
अशी एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजीने शासकीय विश्रामगृहाचा परिसर दणाणून गेला होता. शेवटी निरीक्षक विपुल पिंगळे यांनी बैठक रद्द केली.

याच वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे Amol Shinde हे सुद्धा त्या ठिकाणी गेले मात्र दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी ऐकून त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, यावरून शिवसेनेतील गटबाजी हे चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT