Solapur Saam
महाराष्ट्र

Solapur: आजीसोबतचा प्रवास अखेरचा ठरला! दुचाकी चालवणाऱ्या तरूणीनं ६ वर्षीय चिमुकल्याला चिरडलं, सोलापुरात हळहळ

Solapur Boy's Death: सोलापुरात एक हृदयद्रावक अपघात घडला असून, आजीसोबत रस्ता ओलांडत असलेल्या ६ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर ३१ मे रोजी दुपारी ही घटना घडली.

Bhagyashree Kamble

सोलापुरात एक दुर्देवी अपघाताची घटना घडली आहे. आजीसोबत रस्ता ओलांडत असताना एका चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वेगाने येणाऱ्या दुचाकीने चिमुकल्याला धडक दिली. या धडकेत चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल (वय वर्ष ६) असे मृत बालकाचे नाव आहे. हा अपघात सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर घडला. ३१ मे रोजी दुपारी चिमुकला आपल्या आजीसोबत रस्त्यावरून जात होता. दरम्यान, एका दुचाकीवरून दोन मुली येत होत्या. समोरून येणाऱ्या दोन मुलींनी चालवलेल्या दुचाकीने शिवांशूला जोरदार धडक दिली.

या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तत्काळ त्याला रिक्षामधून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दुचाकी चालवणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवांशूच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी यावर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ३ ठार, २ जखमी

खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि ॲपे रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी व्यक्ती सिरसाळा गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT