Solapur Pune Mumbai Airlines x
महाराष्ट्र

Solapur : सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा कधी सुरु होणार? मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Solapur News : मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या आधी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे विमानसेवा सुरु होणार आहे.

Ganesh Kavade

  • सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरु होणार

  • सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली माहिती

  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासंबंधित निर्णय

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे विमानसेवा लवकरच सुरु होणार आहे. यासंबंधित माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता व्हायबेलिटी गॅप फंडिंगचा निर्णय घेण्यात आला. विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT