Devendra Fadnavis News Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले वृद्ध सामाजिक कार्यकर्ते भोवळ येऊन जमिनीवर कोसळले

Solapur Political News:देवेंद्र फडणवीसांना निवेदन देतानाच वृद्ध आजोबांना भोवळ आली. त्यामुळे ते खाली कोसळले.

Ruchika Jadhav

Solapur News: राज्यात ऊन्हाचा तडाखा वाढला आहे. ऊन्हामुळे नागरिकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतोय. अशात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेला एक व्यक्ती अचानक जमिनीवर कोसळला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Latest Solapur News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी सोलापूरात दाखल झालेत.

तसेच यावेळी पक्षाचा मेळावा देखील घेण्यात येणार आहे. दरम्यान येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी एक वृद्ध व्यक्ती आला होता. निवेदन देण्यासाठी वृद्ध आल्याचे समजले आहे. देवेंद्र फडणवीसांना निवेदन देतानाच वृद्ध आजोबांना भोवळ आली. त्यामुळे ते खाली कोसळले.

निवेदनात काय लिहिलंय?

सदर वृद्ध आजोबा हे ९६ वर्षांचे आहेत. जेव्हा आजोबा खाली पडले तेव्हा फडणवीसांनी लगेचच त्यांची विचारपूस केली. त्यांना तात्काळ पाणी देऊन तेथील गर्दी कमी करण्यास सांगितले. कत्तलखाना बंद करण्यात यावा अशी या वृद्ध आजोबांची मागणी आहे.

वीस मैलांच्या परिसरात कोणताही कत्तलखाना नसावा, कारण या वासामुळे घारीसारखे पक्षी येतात. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आजोबांनी केली आहे. हा कत्तलखाना बंद न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असेही वृद्ध आजोबांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

Maharashtra Tourism: शांत आणि थंड ठिकाणी फिरण्याचा प्लान करताय? मग रत्नागिरीमधील 'हे' हिडन जेम ठरेल बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT