Solapur Political News Saam TV News
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Solapur Political News: शिवाजी सावंत यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि ४० हून अधिक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार.

Bhagyashree Kamble

  • शिवाजी सावंत यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

  • त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि ४० हून अधिक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार.

  • शिंदे गटाच्या सोलापूरमधील बळावर मोठा परिणाम होणार.

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचं बळकटीकरण होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षप्रवेश होताना दिसत आहे. अशातच महायुतीमध्ये नाराज असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या बंधूंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं आहे. दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांच्यासह अनेक समर्थक प्रवेश करणार आहेत.

सोलापूरात शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ कमी आहे. शिंदेंचं सोलापुरात एकही आमदार नाही. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांनी शिदेंची साथ सोडल्यामुळे शिंदे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. दोन दिवसांत त्यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे.

शिवाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नंतर त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.

जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात अंतर्गत बंडाळी कंटाळून शिवाजी सावंतांनी हा निर्णय घेतला. त्यांच्यासह ४० पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिला. अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसला असून, आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT