Sharad Pawar Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात शरद पवार गटाला खिंडार; विधानसभा लढवलेल्या नेत्यासह ४ जणांचा अजित पवार गटात प्रवेश

Solapur Political News : आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

प्रविण वाकचौरे

Solapur News :

शरद पवार येत्या 19 आणि 20 जानेवारीला संघटनात्मक बांधणीसाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहे. मात्र या दौऱ्याआधीत अजित पवार गटाने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. सोलापूर शहरातील 4 माजी नगरसेवकांनी आज मुंबईत अजित पवार गटात प्रवेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आनंद चंदनशिवे, तौफिक शेख, गणेश पुजारी आणि इरफान शेख यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Latest Marathi News)

तौफिक शेख यांनी ‘एमआयएम’च्या उमेदवारीवर सोलापूर शहरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली होती. आनंद चंदनशिवे हे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांची शहरात ताकद आहे.

शरद पवारांचे सोलापूर दौऱ्यातील कार्यक्रम?

शरद पवार शुक्रवारी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगोल्यात माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे शरद पवार अध्यक्ष असणार आहेत.

मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र येणार आहेत.याशिवाय सोलापुरातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT