Solapur Crime News, Yotuh, Police, Women Saam TV
महाराष्ट्र

Filmy Style : भर दिवसा सात बायकांनी युवकाला पळवलं, मित्रांनी केला कारचा पाठलाग अन्...

आकाशच्या मित्रांनी त्या वाहनाचा पाठलाग केला.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूरात (solapur) सात महिलांनी (women) एका युवकाचे (youth) अपहरण करण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा युवकाला दुकानातून (shop) फिल्मी स्टाईलने (filmy style) मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न केला गेला. सर्व महिलांवर पाेलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरातील रंगभवन चौक परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. आकाश काळे (akash kale) हा व्यवसायाने ठेकेदार असलेला युवकाला दुपारी दोनच्या सुमारास दुकानातून मारहाण करत गाडीत घालून पळविण्यात आले. (Maharashtra News)

आकाशच्या मित्रांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर अपहरण कर्त्यांची गाडी अडवली. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गाेंधळ सुरु असताना घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आणि आकाशचा अपहरणाचा प्रयत्न फसला.

आकाश याच्या अपहरण प्रकरणी सात महिला आणि एका पुरुषावर पाेलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव रेड्डी (सहाय्यक पोलीस आयुक्त) म्हणाल्या संबंधित अपहरण करता महिलांवर (भादवी कलम 364-अ , 367, 323, 395 अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT