narasayya adam 
महाराष्ट्र

माकप नेते नरसाय्या आडम यांना साेलापूर पाेलिसांनी घेतलं ताब्यात

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी आमचे आंदोलन आहे पगार वाढीसाठी नव्हे.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपास आज (गुरुवार) माकपने साेलापूरात (solapur) पाठींबा दिला. यावेळी माकपने काढलेल्या माेर्चातील माजी आमदार नरसाय्या आडम (narasayya adam) आणि कार्यकर्त्यांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान एसटी कर्मचा-यांना त्यांना बजावलेल्या नाेटीसांची हाेळी केली.

राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने पगार वाढीचा निर्णय घाेषित केल्यानंतर देखील अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून निलंबनाच्या आणि बदलीच्या नोटिसा धाडल्या जाताहेत. त्या नोटिशींची आज (गुरुवार) सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी होळी केली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी आमचे आंदोलन आहे पगार वाढीसाठी नव्हे. विलिनीकरणानंतरच आंदोलनाचा शेवट होईल असे सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी नमूद करीत नाेटीशांची होळी केली आहे. यावेळी मनोज मुदलीयार, रेश्मा सोनकावडे यांच्यासह आंदाेलकांनी सरकारने तातडीने निर्णय घेऊन देखील प्रवाशांची झालेली अडचण दूर करावी असे नमूद केले.

दरम्यान महिना भरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी सोलापूर माकपाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत एसटी कामगारांना पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे विडी कामगार आणि माकप कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले माजी आमदार नरसाय्या आडम आणि कार्यकर्त्यांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT