Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: आठ स्पोर्ट्स सायकलींसह युवक ताब्यात; डी.बी. पथकाची कारवाई

पोलिसांनी सापळा रचून चाेरास ताब्यात घेतले.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : महागड्या सायकली (bicycle) चोरी केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (vijapur naka police detection branch) एका अटक (arrest) केली आहे. सनी मल्लू पुजारी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून १ मोटारसायकल, ८ सायकली असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी दिली. (solapur latest marathi news)

शहरात सायकली चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे आरोपीचा तपास करत असताना एक संशयित तरुण इंदिरागांधी नगर येथील पोस्ट ऑफीसजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून त्याला त्याबत घेतले.

त्याची विचारपूस केली असता त्याने एक मोटारसायकल विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केली असल्याचे सांगितले. अधिक तपास केला असता त्याने सोलापूर (solapur) शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८ महागड्या स्पोर्ट्स सायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण १ मोटारसायकल आणि ८ स्पोर्ट्स सायकली असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT