Crime News Solapur 
महाराष्ट्र

पाहुणा म्हणून ताे घरात यायचा अन् माेबाईल चाेरुन न्यायचा

विश्वभूषण लिमये

साेलापुर : सोलापुरातील घोंगडे वस्ती येथील एका घरात सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान 'बिन बुलाये मेहमान' चोरट्याला बीडमध्ये अटक केली आहे. सोहेल कमरोद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (solapur-police-arrested-beed-yotuh-mobile-theft-sml80)

याबाबत अधिक माहिती अशी : 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6:45 ते 9 वाजण्याच्या दरम्यान अन्वर हुसेन बागवान यांच्या घरात कार्यक्रम होता. कार्यक्रमादरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. धांदलीत त्याने दोन मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता Crime News Solapur.

संंबंधित मोबाइलचा तपास करीत असताना पोलिसांनी लावलेल्या ट्रेस वरून मोबाइल बीड येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस नाईक वाय.एन.बरडे, बापू साठे हे तिथे गेले. संशयित चोरटा बार्शी नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. तिथे सापळा रचून सोहेल शेख याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चार मोबाइल आढळून आले.

चारपैकी दोन मोबाइल अन्वर हुसेन बागवान यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करून सोलापुरात आणले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, राजेंद्र करणकोट यांनी पार पाडली.

दरम्यान,सोहेल शेख हा बीड येथील रहिवासी असून तो सोलापुरात येऊन पाहुणा म्हणून कोणाच्याही घरात घुसतो. लोकांची नजर चुकवून तो चोरी करतो असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्याच्याकडून आणखी कांही चोऱ्या झाल्या आहेत का याचा तपास आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT