Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur Breaking : सोलापुरात काँग्रेसला धक्का; आमदार प्रणिती शिंदेंचा खंदा समर्थक भाजपात

Solapur News : मेघनाथ यमूल यांच्या भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेशामुळे या भागात आता भाजप मजबूत झाल्याचे मानण्यात येत आहे. मात्र सोलापूर शहरात यमूल यांच्या जाण्याने कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पद्मशाली समाजातील (Solapur) मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचे खंदे समर्थक मेघनाथ येमुल यांनी भाजपॅट प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला. (Latest Marathi News)

मेघनाथ यमूल यांच्या भारतीय जनता पक्षात (BJP) भाजप प्रवेशामुळे या भागात आता भाजप मजबूत झाल्याचे मानण्यात येत आहे. मात्र सोलापूर शहरात यमूल यांच्या जाण्याने कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात पद्मशाली समाजातील मातब्बर नेते म्हणून मेघनाथ येमुल यांची ओळख आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन निवडणुकीत भाजपचा केला होता पराभव 
येमुल यांनी सलग दोन महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभवाची धुळ चारली होती. मात्र मागच्या महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून येमुल यांचा निसटता पराभव झाला होता. आता मेघनाथ येमुल यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला सोलापूर पूर्व विभागात मोठा फटका बसण्याची शक्यता असून महापालिका निवडणुकीत समीकरण बदलणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT