Shahaji Bapu Patil Latest News Saam TV
महाराष्ट्र

Shivsena Crisis : शहाजी बापूंचं तोंड म्हणजे गटार; राऊतांवरील त्या टीकेला युवासेनेचं प्रत्युत्तर

शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी शुक्रवारी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

विश्वभूषण लिमये

Shahaji Bapu Patil Latest News : शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी शुक्रवारी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांचा उल्लेख मातोश्रीचा रेडा म्हणून केला होता. दरम्यान, संजय राऊतांवरील टीकेला युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शेलक्या भाषेत उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचं तोडं म्हणजे गटार आहे, असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही टीका केली आहे. मिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार मधून बाहेर पडला मात्र, राज्यपाल कोश्यारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही शरद कोळी यांनी केला आहे.

त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गट हिंदुत्व पाण्यात घालण्याचं काम करत आहे. गुवाहाटीवरून जेंव्हा शिंदे गटाचे आमदार परत येतील तेव्हा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावाही शरद कोळी यांनी केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.

शहाजी बापू पाटील काय म्हणाले होते?

शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आम्ही ज्यावेळी बंडखोरी करून गुवाहाटीला गेलो त्यावेळी कामख्य़ा देवीला रेडा कापतात असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचार घेत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मातोश्रीचा रेडा म्हणून जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू आहे , रेडा आहे, अशी सडकून टीका शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली. त्याचबरोबर तुम्ही रेडा म्हणून हिणवू नका, कारण रेडा हा महाराष्ट्राचा देव आहे. त्या रेड्यानेच ज्ञानेश्वरीचे वेद म्हटले आहेत अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे रेड्याना तुम्ही शिव्या न देता त्याची पूजा करा आणि आमचीही पूजा करा असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT