Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : दुर्दैवी! बार्शीत व्यावसायिक तरुणाने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

सोलापुरच्या बार्शीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे.

विश्वभूषण लिमये

Latest Solapur News : सोलापुरच्या बार्शीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाने रुग्ण नसलेल्या रूममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमनाथ पिसाळ अस यां आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ पिसाळ हा गावातच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत होता. त्याला सतत पित्ताशयाचा, मणक्याचा त्रास, पचनाचा त्रास आणि पोटात दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यास सतत मानसिक त्रास होत होता. त्यामुळे नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात (Hospital) त्याला उपचारासाठी दाखल केले होते.

सोमनाथवर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिनच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होता. तो बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने रुग्ण नसलेल्या आणि बांधकाम चालू असलेल्या वरच्या मजल्यावर गेला आणि स्लॅबच्या एका हूकला नॉयलानची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

बार्शी (Barshi) शहर पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

SCROLL FOR NEXT