Sanjay raut  Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मोठी बातमी! सोलापुरात संजय राऊतांच्या कारवर चप्पलफेक

Sanjay Raut News In Marathi: सोलापुरातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक झाल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. खासदार संजय राऊत हे गाडीत बसून जात असताना हा प्रकार झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News:

सोलापुरातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक झाल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. खासदार संजय राऊत हे गाडीत बसून जात असताना हा प्रकार झाला आहे. संजय राऊतांच्या कारवर चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांसोबत हुरडा पार्टी केली. त्यानंतर एका सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. या सोलापुरातील दौऱ्यादरम्यानच संजय राऊत कारमधून जात असताना त्यांच्या कारवर चप्पलफेक झाल्याची घटना घडली आहे.

राऊत हे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर संजय राऊत पतरतत असताना चप्पलफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चप्पलफेकीनंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते पसार झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

...म्हणून संजय राऊतांच्या कारवर चप्पल फेकल्याची टीका केली

संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करणाऱ्या सागर शिंदे या तरुणाने समोरं येऊन चप्पलफेक केल्याची कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत असल्याने चप्पलफेक केल्याचा केला दावा तरुणाने केला आहे.

'मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून संजय राऊत यांनी हिनवल्यामुळे चप्पलफेक केल्याचंही सागर शिंदेने सांगितलं. ब्रिजवर चप्पल होत्या, जर दगड असते तर दगडही फेकले असल्याचा दावा तरुणाने केला आहे. तसेच या प्रकारानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो, याची पूर्वकल्पना असल्याचं स्पष्टीकरण तरुणाने दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT