Solapur Zilha Parishad Saam tv
महाराष्ट्र

ACB Action : ५ कोटी ८५ लाखाची बेहिशोबी मालमत्ता; सोलापूरच्या लाचखोर शिक्षणाधिकारीवर अखेर गुन्हा दाखल

Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (Solapur) विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दल (Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अखेर लोहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेतर्फे पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान (ACB) या प्रकरणी किरण लोहार यांची खुली चौकशी करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचे घबाड जमवल्या प्रकरणी किरण लोहार यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ कोटी ८५ हजाराची मालमत्ता 

किरण लोहार (Education Officer) यांच्याकडे तब्बल ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याचे समोर आले. १९९३ ते २०२२ पर्यंतच्या कालावधीत शासकीय सेवक असताना किरण लोहार यांनी घबाड जमवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नाही तर लोहार यांच्या पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल विरोधात देखील बेहिशोबी मालमत्ता जमविण्यामध्ये सहाय्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण, ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

जेवणासोबत तोंडी लावायला बनवा कुरकुरीत सुरणाचे काप, सोपी आहे रेसिपी

Devendra Fadnavis: ४८ हजार कोटीचं वीजबिल माफ अन् दिवसा १०० टक्के वीज; कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

रात्री कोणत्या दिशेला डोके करून झोपावे?| Sleeping Position

SCROLL FOR NEXT