Son Killed Father In Solapur Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: सोलापूर हादरलं! पोरानेच बापाला संपवलं, गळा दाबून घेतला जीव

Son Killed Father In Solapur: दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याची त्याच्या मुलानेच गळा दाबून हत्या केली. या घटनेने सोलापूर हादरले आहे.

Priya More

सोलापूरमध्ये मुलानेच बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूरच्या संजवाड येथे ही घटना घडली आहे. सख्ख्या मुलानेच गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. चंद्रकांत व्हनमाने असे हत्या झालेल्या मृत वडिलांचे नाव आहे. तर सागर व्हनमाने असे आरोपीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याची त्याच्या मुलानेच गळा दाबून हत्या केली. पोलिस तपासात मुलानेच वडिलाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित मुलाला मंद्रूप पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे. चंद्रकांत विठ्ठल व्हनमाने असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आरोपीने वडिलांची हत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत.

सागर चंद्रकांत व्हनमाने असे वडिलांची हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बोळकवठे येथील कुंभारीमध्ये राहणाऱ्या गेनप्पा महादेव पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत व्हनमाने हे बेशुद्ध पडले होते. मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणची त्वचा निघाली होती. शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत व्हनमाने यांची गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला. मात्र त्याची हत्या कोणी केला हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे मंद्रूप पोलिसांनी चंद्रकांत व्हनमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली असल्याचे निष्पन्न आले. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांच्या मुलाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT