Barshi Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : बार्शीत कुंटणखान्यावर छापा; दोन मुलींची सुटका, महिलेस अटक

Solapur News : तेलगिरणी चौकात कुंटणखाना चालवत येथे दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय केला जात आहे; अशी माहिती मिळाली होती

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बार्शी शहरात कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला मिळाली. यावरून पोलिसांच्या (Police) पथकाने येथे छापा टाकून कुंटणखान्यातील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. (Barshi) तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Live Marathi News)

पुण्याच्या सामाजिक संस्थेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील तेलगिरणी चौकात कुंटणखाना चालवत येथे दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय केला जात आहे; अशी माहिती मिळाली होती. यानंतर संस्थेने पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत कुंटणखान्यावर छापा टाकला. येथे बनावट ग्राहक तयार करून कुंटणखान्यामध्ये पाठवण्यात आले. यानंतर खात्री पटताच पोलिसांनी धाड टाकली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सहा महिलांनाही घेतले ताब्यात 

बनावट ग्राहक पाठवून त्याच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख १७ हजार २०० रुपये रक्कम, दोन मोबाईल, इतर साहित्य असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT