Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: मनपा आरोग्याधिकाऱ्याच्या विरोधात प्रहारच चिखलात झोपून आंदोलन

Solapur News : मनपा आरोग्याधिकाऱ्याच्या विरोधात प्रहारच चिखलात झोपून आंदोलन

विश्वभूषण लिमये

सोलापूर : प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांची महापालिका (Bachchu Kadu) आरोग्यधिकाऱ्याने दिशाभूल केली. याचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्तीच्यावतीने चिखलात झोपून आंदोलन केले. (Solapur) यावेळी महापालिकेचा निषेध देखील करण्यात आला. (Maharashtra News)

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे कांही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून बच्चू कडू यांची दिशाभूल करत दिव्यांगांच्या फिजिओथेरपी सेंटरला घेऊन न जाता दुसऱ्याच ठिकाणीचे सेंटर दाखवल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. याचा निषेध करत आज प्रहार कडून मनपाच्या धुळखात पडून असलेल्या फिजिओथेरपी सेंटर समोरील चिखलात झोपून आंदोलन करण्यात आलं आहे.

त्या अधिकाऱ्याचे तोंड काळे करण्याचा इशारा 

मागच्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेच फिजिओथेरपी सेंटर बंद आहे. त्यामुळे असंख्य दिव्यांग बांधवांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रहार कडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा त्यांच तोंड काळ करण्याचा इशारा प्रहारकडून देण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT