TET Exam Scam Saam tv
महाराष्ट्र

TET Exam Scam : बोगस टीईटी प्रमाणपत्र देणे भोवले; ५ शिक्षकांची सेवा समाप्ती, जिल्हा परिषद सीईओंची कारवाई

Solapur News : टीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता. शिक्षण सेवक पद मिळविण्यासाठी प्राप्त गुणांपेक्षा अधिक गुण दाखविण्यात आले होते. या प्रकरणी तब्बल सात हजार ८७४ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : राज्यात टीईटी घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षकांची सेवा समाप्ती करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी ५ शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत २०१८ व २०१९ मध्ये घोटाळा झाला होता. यामध्ये शिक्षणसेवक पद मिळविण्यासाठी परीक्षेत प्राप्त गुणांपेक्षा अधिक गुण दाखविण्यात आले होते. या प्रकरणी तब्बल सात हजार ८७४ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राज्यभरात हा टीईटी घोटाळा गाजला होता. यानंतर सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

कागदपत्र पडताळणीवेळी दिले स्वयंघोषणापत्र 

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पाच शिक्षण सेवकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मार्च २०२४ मध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात आली होती. यावेळी या पाचही शिक्षकांनी हजेरी लावली. तसेच तपासणीवेळी कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नसल्याचे आणि दिलेली कागदपत्रे खरी असल्याचे स्वयंघोषणापत्राचा दाखला दिला होता. 

अखेर शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई 

कागदपत्र पडताळणीनंतर २०२४ साली या पाच शिक्षकांची शिक्षण सेवक पदी नियुक्ती करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, सांगोला तालुक्यात प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून हे पाचही शिक्षक काम करत होते. दरम्यान जिल्हा परिषदेकडून कागदपत्रांची तपासणी, पडताळणी दरम्यान पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात या पाच शिक्षक सेवकांचा समावेश असल्याचं उघड झाले. यानंतर खोटी आणि बनावट कागदपत्र सादर करून शिक्षण सेवक पदी नियुक्ती मिळवल्याचा ठपका ठेवत सीईओनी बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT