Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : लघुशंकेचा बहाणा करत कैद्याचे पलायन; न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता घडला प्रकार 

Solapur News : सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात घरफोडी, दरोडे, चोऱ्या अशा प्रकारचे गंभीर गुन्हे काळे याने केलेले असून त्याच्यावर वैराग पोलिसात गुन्हे दाखल आहेत

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बार्शी तालुक्यातील मोक्का कायद्यांतर्गत आणि इतर गुन्ह्यांत ताब्यात होता. न्यायालयीन कोठडीतील (Prisoner) कैदी आनंद काळे याला बार्शी (Barshi) न्यायालयात सुनावणीस आणले होते. या दरम्यान त्याने लघुशंकेस जाण्याचा बहाणा करत बाथरूमच्या खिडकीतून उडी टाकून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात घरफोडी, दरोडे, चोऱ्या अशा प्रकारचे गंभीर गुन्हे  काळे याने  केलेले असून त्याच्यावर वैराग पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार वैराग पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर १४ जुलै २०२१ रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यास त्यावेळी बार्शी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. मोक्का लावल्याने त्यास सोलापूरच्या कारागृहात रवाना केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनावणी झाल्यानंतर पलायन  

दरम्यान बार्शी न्यायालयात सुनावणी असल्याने सोलापूर कारागृहातून पोलिस येथे घेऊन आले होते. त्यास येथे आणल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले. त्यानंतर त्याला सरकारी गाडीत घेऊन जात होते. यावेळी काळे याने पोलिसांना लघुशंकेस जाण्याचे सांगितले. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याने खिडकीतून उडी टाकून पळ काढला. यानंतर त्याने गल्लीबोळाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो काही सापडला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : वैभव सूर्यवंशी, इशान किशन की तिलक वर्मा... कोणाला देणार डच्चू? इंग्लंडविरुद्ध संघात संजू सॅमसनची पुन्हा होणार एन्ट्री

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला भेट देणार

Heart attack prevention: हार्ट अटॅक टाळण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट फॉलो करतात ६ सवयी; तुम्हीही आजच सुरू करा...

Nails Care : नखांवरील सफेद डाग असू शकतात या गंभीर आजाराची लक्षणे

SCROLL FOR NEXT