Solapur DCC Bank Saam tv
महाराष्ट्र

Solapur DCC Bank : सोलापूर जिल्हा बँकेवर प्रशासकाला मार्चपर्यंत मुदतवाढ; न्यायालयाच्या आदेशानंतर सहकार आयुक्तांचा निर्णय कायम

Solapur News : सोलापूर जिल्हा बँकेवर २९ मे २०१८ रोजी प्रशासक नियुक्त झाले. यानंतर सहा वर्षापासून प्रशासकांना मुदतवाढ देत आहे. प्रशासकांच्या कालावधीत बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली, तोट्यातील बँक नफ्यात आली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत चार आठवड्यांत निर्णय घेण्याचा उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशावर देखील सहकार आयुक्तांनी आदेश काढला आहे. येत्या मार्च २०२६ पर्यंत बँकेवर प्रशासकाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे डीसीसी बँकेवर सलग सात वर्षे प्रशासकराज राहणार आहे.

सोलापूर जिल्हा बँक संचालक मंडळाने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या ठेवी, कर्जाच्या माध्यमातून स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या संस्थांना वाटून घेतल्या. घेतलेले कर्ज कोणीही संचालक भरण्यास तयार नसल्याने बँकेच्या एनपीएत मोठी वाढ झाली. तोट्यातही वाढ झाली आणि शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी बँकेकडे पैसे राहिले नाहीत. तेच संचालक आणि वसुलीही तेच करणार असल्याने बँकेसमोरील अडचणी वाढत गेल्या. त्यातच नाबार्डच्या तपासणी अहवालात बँक आर्थिक नाबार्डच्या अहवालावर रिझर्व्ह बँकेने सोलापूर डीसीसीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केले होते. 

सहा वर्षांपासून मिळतेय मुदतवाढ 

त्यानुसार सोलापूर जिल्हा बँकेवर २९ मे २०१८ रोजी प्रशासक नियुक्त झाले होते. या नंतर गेल्या सहा वर्षापासून प्रशासकांना मुदतवाढ शासन देत आहे. तर प्रशासकांच्या कालावधीत बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली, तोट्यातील बँक नफ्यात आली. एनपीए कमी झाला. ठेवी पाच हजार कोटींवर गेल्या. आता बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत विकास सोसायट्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाच्या आदेशनानंतरही निर्णय कायम 

दरम्यान उच्च न्यायालयाने चार आठवड्यांत निर्णय घ्यावा; असे आदेश २४ मार्च २०२५ रोजी दिले होते. या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी शासनाने बँकेच्या प्रशासकांना ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून ती कायम असल्याचा आदेश काढला आहे. अर्थात या आदेशामुळे बँकेवर सलग सात वर्षापर्यंत प्रशासक राहणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT