CoronaVirus Saam tv
महाराष्ट्र

CoronaVirus: दीड वर्षानंतर कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; सोलापूरात एकाच दिवशी आढळले ८ रुग्ण

दीड वर्षानंतर कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; सोलापूरात एकाच दिवशी आढळले ८ रुग्ण

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ८ रुग्ण आढळून आले. दरम्यान, शहरातील एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद (Solapur) सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे. तब्बल दीड वर्षानंतर सोलापुरात (Corona) कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (Letest Marathi News)

देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला होता. कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत भयंकर परिस्‍थीती झाली होती. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर आता देशात H3N2 व्‍हायरसने डोके वर काढले आहे. देशासह राज्‍यातील अनेक शहरांमध्‍ये देखील H3N2 रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्‍यान सोलापूर जिल्‍ह्यात आतापर्यंत १६ रुग्ण आढळून आले असून दीड वर्षानंतर ८० वर्षीय वयोवृद्धेचा मृत्‍यू (Corona Death) झाल्‍याची नोंद सोलापूर महापालिकेत झाली आहे.

दमा, पक्षाघाताचा त्रास

मयत झालेली व्यक्ती ही बुबणे चाळ रेल्वे लाईन परिसरातील आहे. मयताचे वय ८० वर्षे असून त्यास दमा, पक्षाघात असल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

११८ कोरोना टेस्‍ट

काल १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात रॅपिड ॲंटीजन टेस्टचे २८, तर आरटीपीसीआर टेस्टचे १८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात ३ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT