Solapur Congress Saam tv
महाराष्ट्र

Solapur Congress : सोलापूर विमानसेवेवरून काँग्रेस आक्रमक; हवेत विमान आणि फुगे सोडून केलं विमानसेवेचे उद्घाटन

Solapur News : सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापुरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापूर येथे विमानतळ सुरु करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणावरून अद्याप विमान सेवा सुरु झालेली नाही. विमान सेवा सुरु करण्याबाबत वारंवार आश्वासन देण्यात आले आहेत. तरी देखील अद्याप याचा मुहूर्त सापडलेला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले. विमानतळासमोर येत हवेत फुगे आणि विमान सोडून प्रतीकात्मक विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले.

सोलापुरात साकारण्यात आलेल्या विमानतळावरून विमानसेवा सुरु होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे. सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापुरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदार्नखाली आजचे आंदोलन करण्यात आले आहे. 

हवेत सोडले विमान व फुगे 

काँग्रेसने विमानसेवा सुरु करण्यात बाबत आक्रमण भूमिका घेतली आहे. यावेळी 'सांग सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरु होईल का?, भोलानाथ सरकारला सुबुद्धी सुचल काय?' असे म्हणत प्रतिकात्मक भोलानाथ आणून त्याला प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारची खिल्ली उडविली आहे. तसेच सोलापूर विमानतळ समोर हवेत विमान आणि फुगे सोडून विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. 

तर व्हीआयपी विमान उतरू देणार नसल्याचा इशारा 
अनेक मंत्र्यांनी विमानतळ सुरु करण्याबाबत वारंवार आश्वासन जात आहे. परंतु प्रत्यक्षात विमानसेवा सुरु झालेले नाही. अर्थात सोलापूरकरांच्या भावनेशी खेळ खेळला जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसध्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरु नाही झाली; तर कोणत्याही व्हिआयपी माणसाचे विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT