Shocking Incident in Solapurs Barshi Saam
महाराष्ट्र

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Shocking Incident in Solapurs Barshi: सोलापुरातील बार्शीतून एक धक्कादायक बातमी समोर. विवाहितेनं आधी बाळाला संपवलं, नंतर स्वत: आयुष्याचा दोर कापला. पोलिसांकडून तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • सोलापुरात विवाहितेनं बाळाला विष पाजलं.

  • स्वत: आयुष्याचा दोर कापला.

  • आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पोटच्या चिमुकल्याला विष पाजून आईनं गळफास लावून आयुष्य संपवलं. या प्रकरणात आईचा जागीच मृत्यू झाला आहे तर, चौदा महिन्यांच्या चिमुकल्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची मृत्यूसोबतची झुंज सुरू आहे. महिलेनं टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अंकिता उकिरडे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही धक्कादायक घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरातून उघडकीस आली. महिलेनं आधी चौदा महिन्यांच्या बाळाला विष पाजलं. नंतर आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात अंकिता उकिरडे यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अंकिताचा मतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. तसेच चिमुकल्याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेले. बाळावर सध्या बार्शीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अंकिताने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? सध्या या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर बार्शीत हळहळ व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT