Solapur Aurangzeb Status Saam Tv
महाराष्ट्र

Aurangzeb Status : १४ जणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं, सोलापुरात तणाव; पोलीस अॅक्शन मोडवर

Solapur News : औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आणखी कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

Yash Shirke

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

औरंगजेबाच्या कबरेवरुन सध्या राजकारण तापले आहे, अनेक संघटना, राजकीय नेत्यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे. अशातच सोलापूरमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या १४ व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत या घटनेची दखल घेतली. त्यानंतर औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.

या प्रकरणी मैंदर्गी गावातील १३ जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी कबुल केले आहे. त्यांनी याबाबत विधानसभेत खंत देखील व्यक्त केली आहे. दरम्यान औरंगजेब आणि त्याच्या कबरीमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT