Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: अजित पवारांची शपथ; सोलापूरात राष्‍ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

अजित पवारांची शपथ; सोलापूरात राष्‍ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात पुन्‍हा भुकंप झाला असून अजित पवार यांच्‍यासमवेत राष्‍ट्रवादीचे (NCP) आमदार फुटले आहे. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर फटाके फोडत जल्लोष केला. (Latest Marathi News)

महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात गेल्‍यावर्षी मोठा भुकंप झालेला पहावयास (Solapur) मिळाला होता. यात शिवसेनेचे चाळीस आमदार फुटले होते. यानंतर पुन्‍हा भुकंप झालेला पहावयास मिळाला असून यावेळी राष्‍ट्रवादीचे आमदार भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्‍यासोबत जावून पाठींबा दर्शविला आहे. यात आज राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची तर राष्‍ट्रवादीच्‍या आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. यानंतर सोलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तसेच कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिठाई वाटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT