solapur municipal corporation removed encroachment near zilla parishad saam tv
महाराष्ट्र

Solapur Zilla Parishad : साेलापूर महापालिकेने जिल्हा परिषद परिसरातील अतिक्रमणे हटवले

Solapur Latest Marathi News : यापूर्वी दुकानदारांच्या विरोधामुळे साेलापूर महापालिका अतिक्रमण पथकाला माघारी फिरावे लागले होते.

विश्वभूषण लिमये

Solapur :

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेल्या अनेक वर्षापासून असलेली खोकी आज (शुक्रवार) साेलापूर महापालिकेच्या (solapur municipal corporation) अतिक्रमण हटाव पथकाने काढली. यावेळी पाेलिसांनी परिसरात बंदाेबस्त ठेवला हाेता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर मोठ्या प्रमाणात खोकी वाढलेली होती. टायपिंग सेंटर, झेरॉकस दुकान, चहाच्या टपऱ्या इत्यादी या ठिकाणी सुरु होत्या. यापूर्वी महापालिकेने दुकानदारांना नोटीस देऊन कारवाईचे प्रयत्न केले हाेते. (Maharashtra News)

त्यावेळी दुकानदारांच्या विरोधामुळे अतिक्रमण पथकाला माघारी फिरावे लागले होते. यावेळेसही अतिक्रमणधारकांनी विरोध केला मात्र महापालिका अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदाेस्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT