solapur, solapur muncipal corporation, police saam tv
महाराष्ट्र

Solapur : मूर्ख म्हटल्यानं शिंदे गटाच्या समर्थकांनी अडविल्या पाेलिसांच्या गाड्या

महापालिका कर्मचाऱ्यांनी आज आयुक्त हटाव मागणीसाठी पुकारलं होत एकदिवसीय काम बंद आंदोलन.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : महापालिका आयुक्तांची बदली करा या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर (morcha) माेर्चेकरांना ताब्यात घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील समर्थक आणि पाेलिसांची शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गाेंधळ निर्माण झाला. (Solapur Muncipal Corportation Latest Marathi News)

सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आराेप करीत त्यांची बदली करावी या मागणीसाठी आज महापालिकेतील शेकडाे कर्मचारी रस्त्यावर उतरले. या कर्मचा-यांनी त्यांच्या मागणीसाठी आज एक दिवस लाक्षणिक संप देखील पुकारला हाेता.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माेर्चेक-यांनी पाेलिसांना दिलेल्या वचनाचं पालन न केल्याचं म्हणणं मांडत महिला पाेलिस अधिका-यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली. त्यास शिंदे समर्थकांनी आक्षेप घेतला. यावेळी पाेलिस आणि शिंदे समर्थक यांची खडाजंगी झाली.

पोलिसांनी महापालिका कामगारांना शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केली. तर दमबाजी करु नका कायद्याचे पालन करा असं पाेलिस वारंवार शिंदे समर्थकांना आवाहन करीत हाेते. त्यातच काही ज्येष्ठ आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्यानं कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या गाडी अडवली.

यावेळी शिंदे समर्थकांनी कामगारांना मुर्ख म्हणण्याचा अधिकार पाेलिसांना दिला गेला आहे का असा प्रश्न उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांही काळ तणावपूर्व वातावरण निर्माण झालं हाेतं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT