Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनाही बंद होणार? प्रणिती शिंदे थेटचं बोलल्या

Khasdar Praniti shinde news : लाडकी बहीण आता सावत्र झाली, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. त्या सोलापूरमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी ही योजना बंद होईल, असा दावाही केला आहे.

विश्वभूषण लिमये

Praniti Shinde ON Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे. दंडासह पैसे वसूल केले जाणार, त्या भीतीमुळे काही अपात्र महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही यावरून टीका केली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीत. उलट बिघडवतायत त्यामुळे प्लिज माझ्या देशाला वाचवा म्हणून विनंती केली, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा केला आहे. सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं, तेव्हा विडी कामगारांचे कारखाने वाचले, कामगारांना पेन्शन मिळत होतं, सिलेंडर फक्त 800 रुपयाला होतं. आता संजय गांधी निराधार पण बंद झालं आणि लाडकी बहीण पण बंद होणार आहे. लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे. पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि सौरक्षण मिळणार आहे का..? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय.

पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल नंतर खा मार नवऱ्याचा. पैसे घेऊन दारू थांबणार नाही, मग काय उपयोग..? पैसे घेऊन बिनधास्त जगायला मिळणार आहे का? सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मात्र भाजपला वाटत तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला पाहिजे, असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

तरुण मुलं हे व्हॉट्सअप बघतात आणि त्या नादाला जातात, त्यामुळे व्हॉट्सअप ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्यात कट्टरतेचं विष पेरून लोकांची भांडणं लावली जातात. सोलापूरच्या गड्ड्याच्या जत्रेत सगळेच जातात, मी पण जाते,गड्डा सगळ्यांचाच आहे. कोणाचा इकडे हक्क नाहीये, सोलापूर सगळ्यांचेच आहे. देशाला वाचवा एवढी विनंती करते. 43 लाखाचं काम करत आहे, त्यामुळे कामाला किंमत द्या,मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी सोलापूरकरांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT