Arrest Saam Tv
महाराष्ट्र

घरफोड्या, दुचाकी चोरीप्रकरणी MIDC पोलिसांनी सापळा रचून केली चौघांना अटक

या चौघांकडून तेरा तोळे सोने, एक मोटारसायकल, १० मोबाईल आणि एक लाख ३ हजारांची रोख रक्कम हस्तगत केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर (soalpur) शहरात (solapur city) काही दिवसांपुर्वी झालेल्या घरफोड्या, मोटरसायकल चोरीप्रकरणी चौघांना एमआयडीसी पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. संबंधित संशयितांकडून सात लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (solapur latest marathi news)

जमीर शेख, आनंद कोडम, अक्षय सामलेटी तसेच एक (विधी संघर्ष) बालक अशांना अटक करण्यात आलेली आहे. हे चौघेजण चोरीचा माल विक्री करण्यासाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली हाेती.

पाेलीसांनी कुंभारी हद्दीत सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या चौघांकडून तेरा तोळे सोने, एक मोटारसायकल, १० मोबाईल आणि एक लाख ३ हजारांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. तपासामध्ये अशोक चौकातील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचाही गुन्हा उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT