Tension escalates in Madha village as police deploy security amid clashes over Shivaji Maharaj statue dispute. Saam Tv
महाराष्ट्र

महाराजांच्या पुतळ्याला विरोध केल्यास लक्ष्मण हाकेंना कपडे फाटूस्तर मारू...; माढ्यातल्या राड्यावरुन पाटलांचा इशारा

Madha Shivaji Maharaj Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजनगाव खोलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मराठा आणि धनगर समाजात तणाव निर्माण झाला असून हा वाद दगडफेक आणि लाठीचार्जपर्यंत पोहोचला आहे.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

माढा तालुक्यातील अंजनगाव खोलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मराठा आणि धनगर समाजामध्ये तणाव निर्माण झाला असून आता हा वाद दगडफेक आणि लाठीचार्जपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता दोन्ही बाजूनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण अधिकच तापले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी पुतळा बसवण्याच्या मुद्यावरून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना थेट इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केल्यास रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारू अशी कठोर भाषा त्यांनी वापरली. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यभरात आतापर्यंत 600 पुतळे परवानगीशिवाय बसवले असून पुढेही हे काम सुरूच राहणार आहे. संबंधित जागा खोलोबा देवस्थानची नसल्याचा दावा करत विरोध करू नये, असे ही ते म्हणाले.

दरम्यान बाळराजे आवारे पाटील यांच्या या व्यक्तव्याला ओबीसे नेते लक्ष्मण हाके यनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मारण्याची भाषा करू नका, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत. तसेच तुम्ही आमच्या तीर्थक्षेत्राची विटंबना केली. खेलोबा मंदिरावर दगडफेक केली असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या वादामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT