Solapur  saam tv
महाराष्ट्र

तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

Solapur News : एकदा कुत्र्याला माया लावली, त्यांच्यावर प्रेम केले, तर ते नेहमी त्यांच्या मालकाशी प्रामाणिक राहतात, या गोष्टीचा प्रत्यय सोलापूरमध्ये अनुभवायला मिळाला आहे.

Yash Shirke

  • मालकाचा अल्पशा आजाराने मृत्यू

  • लाडका कुत्रा स्मशानभूमीतच राहिला

  • सोलापूरच्या वडवळमधील घडना

Solapur : कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे असे म्हटले जाते. कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी, त्याच्याइतका प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाहीये असेही सांगितले जाते. जर एखाद्याने कुत्र्याला जीव लावला, तर जिवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो. याचा प्रत्यय नुकताच सोलापूरमध्ये अनुभवायला मिळाला.

सोलापूरच्या वडवळ येथे एका शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूनंतर ज्या स्मशानभूमीत त्या शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कुत्रा मागील नऊ दिवसांपासून एकटाच हताशपणे बसून आहे. त्याला स्मशानभूमीतून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून जात नाही असे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी आणि मुलांच्या सोबत राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

तानाजी पवार यांचा लाडका कुत्रा स्मशानभूमीतून बाहेर जात नाहीये. मालकावर अंत्यसंस्कार केल्यापासून आता नऊ दिवस झाले, तरी पवार यांचा कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. काहीजणांनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. हे चित्र पाहताना वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून मुक्या प्राण्याविषयी कौतुकाचे शब्द काढले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT