पावणेतीन लाखांसह सुकामेवावर ही चोराचा डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद Saam Tv
महाराष्ट्र

पावणेतीन लाखांसह सुकामेवावर ही चोराचा डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

नंदकिशोर तिवाडी यांच्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस ठाण्यात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभुषण लिमये

सोलापूर - भवानी पेठेतील Bhavani Peth अन्नपूर्णा नमकीन मिठाई फॅक्टरीच्या Sweet Factory ऑफिसचे लॉकर तोडून चोराने दोन लाख ७६ हजार ७४३ रुपयांची चोरी केली. त्या सोबत जाताना चोराने काजू, केळी वेफर्स आणि शाबू चिवडा ही घेऊन गेला. ही घटना काल पहाटे घडली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी नंदकिशोर तिवाडी यांच्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस Police ठाण्यात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा -

काल पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोराने अन्नपूर्णा नमकीन फॅक्टरीच्या गेटवरून फॅक्टरीमध्ये प्रवेश केला.फॅक्टरीचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून त्याने फॅक्टरीत प्रवेश केला. त्यानंतर आतील बाजूस असलेल्या केबिनचे लॉक तोडून ड्राव्हर मधील रोख रक्कम टेबलावर काढून ठेवले.

त्यानंतर बाहेरील बाजूस असलेली पिशवी आणून त्यात पैशाचे बंडल घालून घेऊन गेला. आणि जाताना फॅक्टरीमधील केळी वेफर्स,शाबू चिवडा,शेव वेफर्स आणि काजूचे पाकिटे घेऊन गेले.ही सर्व घटना काही मिनिटातच घडली असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

SCROLL FOR NEXT